Wednesday, October 02, 2024 11:06:23 AM

'शाळांचे खासगीकरण करू नका'

शाळांचे खासगीकरण करू नका

बुलढाणा , २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान निंबोळा येथे १०५ जोडप्यांनी महायज्ञ करत सरकारला बुद्धी देण्यासाठी निंबा आईकडे साकडे घातले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची परिस्थिती पाहता, शाळांचे खासगीकरण न करता, सरकारी शाळांचा दिल्ली पॅटर्न राबवा, नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेली शेतकरी कन्या - पुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा, त्याच बरोबर गाव तिथं अभ्यासिका सुरू कराव्या या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून निंबा आई समोर महायज्ञ करून साकडे घातले आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित रहात आहेत. सरकारने तात्काळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी निंबोळा गावात असलेल्या निंबा देवीसमोर १०५ दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साकडे घातले आहे.


सम्बन्धित सामग्री