Sunday, April 13, 2025 02:14:39 AM

कोकण रेल्वेवर मंगळवारी ब्लॉक

कोकण रेल्वेवर मंगळवारी ब्लॉक

रत्नागिरी,२५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मालमत्तेची देखभाल दुरुस्तीसाठी कोकणात मंगळवारी अडीच तासाचा मेगाब्लॉक असणार आहे. २६ डिसेंबर रोजी १२:४० ते ०३:१० या वेळेत २:३० तास मेगाब्लॉक चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कोईमत्तूर जबलपूर विशेष गाडी आणि सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वेवर मंगळवारी ब्लॉक

गाडी क्र. ०२१९७ कोईम्बतूर जं. - २५/१२/२३ रोजी सुरू होणारा जबलपूर विशेष प्रवास कणकवली - संगमेश्वर रोड विभागादरम्यान १:४५ मिनिटासाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास २६/१२/२३ रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड - रत्नागिरी विभागादरम्यान ०१:१५ मिनिट तासांसाठी नियमित केला जाईल.


सम्बन्धित सामग्री