Sunday, June 30, 2024 09:59:22 AM

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मुंबई, २४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अंतरवाली सराटीतून निघेपर्यंत चर्चा करून निघाल्यानंतर चर्चा बंद असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय आहे. २० जानेवारीला मुंबईला जाण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेत केली होती. यामध्ये दहा लाख गाड्या सहभागी होणार असून तीन कोटी मराठा समाज मुंबईला धडकणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. याच्या तयारीसाठी हा वेळ असून सरकारला आम्ही वेळ दिलेला नाही आहे. त्याचबरोबर भुजबळांना आता महत्व देणार नसून ते बधीर झाला असल्याची टीकाही जरांगे पाटील यांनी केलीय. दरम्यान आता सरकारला कळेल की मराठे सोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो असेही जरांगे यांनी म्हटलं.


सम्बन्धित सामग्री