बीड, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेले अल्टीमेटम संपण्यास दोन दिवस बाकी आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. जरांगे पाटलांची पुढची सभा शनिवारी (ता. २३) बीड येथे होणार आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील दिशा स्पष्ट करु, असा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या राज्यभर विविध ठिकाणी सभा होत आहेत.
२४ डिसेंबरच्या अल्टिमेटम नंतर बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा सभेचे आयोजन केलेलं आहे. या सभेतून २४ डिसेंबर च्या आधी मनोज जरंगे पाटील इशारा सरकारला देणार आहेत. मैदानाची पूर्ण तयारी झाली असून या सभेला अंदाजे दहा लाखाच्या आसपास लोक येतील असं आयोजकांचा विश्वास आहे.