Saturday, April 19, 2025 06:10:59 AM

खासदार निलंबन निषेधार्थ धुळ्यात आंदोलन

खासदार निलंबन निषेधार्थ धुळ्यात आंदोलन

धुळे, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: जिल्हा काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकशाही बचाव आंदोलन करण्यात आलं. केंद्रातील भाजपा सरकारने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या १५० खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीची हत्त्या करत हुकूमशाही पद्धतीने विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन केलं असून सरकार लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी सरकारच्या लोकशाही व संविधान विरोधी कृत्याचा निषेध करत लोकशाही बचाव दिन पाळण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री