मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि २१) १२ ते २ दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गुरुवारी करण्यात येणार आहे. ही कामे दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा ८.२०० कि.मी येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट ४२.कि.मी येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.