Saturday, October 05, 2024 04:32:55 PM

दुष्काळामुळे हरणांची परवड

दुष्काळामुळे हरणांची परवड

मनमाड, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गीक अधिवास बघावयास मिळतो. चालूवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे चारा, पाण्यासाठी या हरणांची मोठी परवड होताना दिसत आहे. या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याने हरणांची उपासमार होताना दिसत आहे. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या नदी, नाले, छोटे मोठे पाण्याचे डबके कोरडे आहेत. परिणामी चालू वर्षी पिण्याच्या पाण्याची व चाऱ्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चारा पाणी नसल्याने हरणांचे हाल होत आहे. अन्न पाण्याच्या शोधात हरणांचे कळप गावाकडे येत आहे. या कळपावर मोकाट कुत्रे हल्ले करीत असल्याने हरण जखमी झाल्याच्या घटना घडत आहे. या घटना टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणांचा वावर असलेल्या वनपरिक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची व चाऱ्यांची सोय करण्याची मागणी प्राणीप्रेमी करीत आहे.


सम्बन्धित सामग्री