Saturday, October 05, 2024 04:50:40 PM

राज्यातील गावांचा कारभार झाला ठप्प

राज्यातील गावांचा कारभार झाला ठप्प

संभाजीनगर, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक संघटनेने तीन दिवस कामकाज बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून पुढील तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प राहणार आहे. राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद राहणार असून नगरमध्येही सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होत एकही काम करणार नाहीत, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे.

एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रामसेवक संघटनेची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गाव पातळीवरील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक होण्याकरता राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरता तीन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य स्तरावरावर घेण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री