Saturday, April 26, 2025 12:28:31 AM

पुणे - नाशिक महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात

पुणे - नाशिक महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात

नाशिक, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर धावता आयशर टेम्पो कारवर कोसळल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. यात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने एक महिलेचे प्राण वाचविण्यास यश आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या चौघांमध्ये २ वर्षीय ओजस्वी धारणकर, ४२ वर्षीय आशा सुनील धारणकर, ६५ वर्षीय सुनील धारणकर आणि ४८ वर्षीय अभय सुरेश विसाळ यांचा समावेश आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. जखमी महिलेवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सम्बन्धित सामग्री