Wednesday, October 02, 2024 12:54:02 PM

प्रेयसीला कारखाली चिडल्याचं प्रकरण

प्रेयसीला कारखाली चिडल्याचं प्रकरण

ठाणे, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: ठाण्यात प्रिया सिंग नामक तरुणीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी अश्वजीत गायकवाड, रोमील पाटील आणि सागर शेडगे या तिघांना अटक करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही अटकेची कारवाई केली.

प्रेयसीला कारखाली चिरडल्या प्रकरणात फरार आरोपी अश्वजीत गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेळके या तिघांना स्थापना केलेल्या एसआयटी पथकाने अटक केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रारदार पीडितेच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणी आता ठाणे पोलीस आयुक्तांनी सखोल तपासासाठी, डीसीपी झोन ५ अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि या प्रकरणाच्या सर्व बाजूंचा शोध घेत होती. याप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्ये उघड झाल्यास कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाईल.


सम्बन्धित सामग्री