Sunday, July 07, 2024 12:22:13 AM

शालेय पोषण आहारात निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप

शालेय पोषण आहारात निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप

शालेय पोषण आहार निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप केलं जात असल्याचा धकादायक प्रकार नांदेडात समोर आला आहे. विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे कडधान्य निकृष्ट असल्याचे कारण देत भोकर येथील एका शाळेने हे धान्य परत केलं आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे. यासाठी शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नसल्यामुळे शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांसाठी मूग डाळ, चणा, वाटाणे, खाद्य तेल, मिरची पूड, मसाले असे पदार्थ दिले जातात. मात्र खाऊची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार शाळेतील मुख्याध्यापकांच्या समोर आल्यानंतर सदरील धान्य घेण्यास नकार देण्यात आला. या प्रकरणाचा भोकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा देखील केला असून आता जिल्हा परिषद प्रशासन निकृष्ट पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार हे पाहवं लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री