Sunday, July 07, 2024 08:20:37 PM

भोंदूगिरी करुन युवकांची फसवणूक

भोंदूगिरी करुन युवकांची फसवणूक

पुणे, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाठ या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दापाश केला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

नैराश्यग्रस्तांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी व यश मिळवण्यासाठी समुपदेशन केले जाईल, अशी जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून करत लोकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे तरुणाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याला नैराश्य आले. सोशल मीडियावर त्याला या समुपदेशनाबाबत समजले. फिर्यादी वृषाली ढोले यांच्याकडे गेला असता, स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी तरुणाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. त्यानंतर पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. तसेच, स्वत:च्या अंगी अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. असे करत संबंधित युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

        

सम्बन्धित सामग्री