Thursday, July 04, 2024 10:23:55 AM

साखरखेरडा गावात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

साखरखेरडा गावात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

बुलढाणा, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील शेतकऱ्यांचा रस्ता हा पाण्याखाली आल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही. परिणामी त्यांची शेती पडीक राहण्याची शक्यता आहे. साखरखेरडा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर मागील उन्हाळ्यात कोल्हापुरी बांधला असून त्यामुळे आता नदीत पाणी साचले आणि या पाण्याचा प्रवाह जवलपास एक किलोमीटर पर्यंत आल्याने रस्ताच पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या काठावरून त्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाता येत नाही. बैलगाडी, शेती साहित्य, बी बियाणे, खत काहीही नेता येत नसल्याने अनेकांनी शेती पडीत ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी कसे बसे थर्मोकोलच्या सीट वापरून तात्पुरती सोय केली आणि पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. मजूर तर लगेच येत नाही. त्यामुळे आता शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही प्रमाणात पाणी कमी करायला अधिकाऱ्यांना मृत आणि जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र याकडे कोणताच अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


सम्बन्धित सामग्री