Monday, July 01, 2024 03:31:13 AM

प्रेक्षक गॅलरी कोसळून चौघे जखमी

प्रेक्षक गॅलरी कोसळून चौघे जखमी

रायगड, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा इथं कबड्डी स्पर्धा सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळून चौघेजण जखमी झाले. यातील तिघांना सरकारी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्पर्धा पाहायला प्रेक्षकांची गर्दी झाली होती. त्याचवेळी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

https://youtu.be/QNz_uZ8K0-s


सम्बन्धित सामग्री