Tuesday, July 02, 2024 08:07:18 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

बुलढाणा, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून लढत आहेत. त्यांच्या लढ्याला बऱ्यापैकी यश आलं असून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने रविकांत तुपकरांशी सकारात्मक चर्चा करत बहुतांश मागण्या मान्य देखील केल्या आहेत. मात्र १५ डिसेंबर पर्यंत या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मदत मिळेल असे आश्वासन सरकारकडून दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झाली नाही. त्यामुळे गारपीट, अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दोन दिवसात जर सरकारने मदत केली नाही तर १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनावर धडक देत शेतकऱ्यांची ताकद काय असते हे दाखवून देऊ अशी भाषा रविकांत तुपकर यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन नागपूरच्या अधिवेशनावर धडक देणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार नागपूरच्या अधिवेशनावर पाहायला मिळू शकतो.


सम्बन्धित सामग्री