Saturday, October 05, 2024 03:21:49 PM

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा

पंढरपूर, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अवघ्या राज्याचे दैवत आहे. या ठिकाणी आषाढी वारी निमित्त आणि रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेऊन झाल्यावर येथील प्रसादाचा लाडू देखील घेऊन जातात. मात्र, या प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले आहे. लेखापरीक्षणाच्या अहवालात ही बाब उघड झाली असून हा अहवाल अधिवेशनात मांडण्यात आला आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल आणि त्यावरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू हा निकृष्ट असल्याचे समोर आहे. जो बचत गट हा लाडू बनवतो त्या ठिकाणीची जागा ही अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी वापरण्यात येणारे कापड देखील अस्वच्छ असल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री