Saturday, April 26, 2025 12:29:04 AM

सोमवारी इंदापूर बंद

सोमवारी इंदापूर बंद

इंदापूर, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: इंदापूरात गेल्या ४७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. या दरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या दिशेने अंगावर चपला फेकल्याचा प्रकार घडला.

या घटनेनंतर काही वेळातच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी येथील मुख्य रास्ता अडवत रास्ता रोको आंदोलन केले तसेच चप्पल फेकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान सोमवारी पडळकरांवर चप्पलफेकीच्या निषेधार्थ सोमवारी इंदापूर बंद आवाहन ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. तसे निवेदन इंदापूर पोलिसांना देण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री