Saturday, July 06, 2024 11:32:30 PM

रांजणगाव देशमुख येथील महिलांचं उपोषण

रांजणगाव देशमुख येथील महिलांचं उपोषण

शिर्डी, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: निळवंडे धरणाच्या पाण्यातून गावातील पाझर तलाव भरून द्यावेत. या मागणीकरिता धरणाच्या लाभ क्षेत्रातील, रांजणगाव देशमुख येथील महिलांनी उपोषण सुरू केलेलं आहे. उत्तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा समजल्या जाणाऱ्या, निळवंडे धरणामुळे १७२ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याने लाभक्षेत्रातील गावांमधील नागरिक आतुरतेने पाण्याची वाट बघत असतात. कालवे अर्धवट स्थितीत असतांना, पंतप्रधान मोदींच्या हस्ते धरणाचे लोकार्पण झाले. त्यानंतर जायकवाडीस पाणी देखील सोडण्यात आले. मात्र अजूनही लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणी काही पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत उपोषण सुरू केलेलं आहे.


सम्बन्धित सामग्री