Sunday, June 30, 2024 09:38:30 AM

ग्रामीण भागात वातावरण बदलाचा परिणाम

ग्रामीण भागात वातावरण बदलाचा परिणाम

संभाजीनगर, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: ग्रामीण भागामध्ये मागील आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाने रात्री थंडी दुपारी ऊन तर कधी शितलहर असे सध्या वातावरणात कमालीचे बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. या बदलामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आजाराने लहान बाळापासून तरुण आणि जेष्ठ नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे शासकीय ग्रामीण रुग्णलयासाह खाजगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री