चंद्रपूर, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: भारत देशात स्वातंत्र्याची ७५ वा. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा होत असले तरी जिवती तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, भूमीहीन यांना अनेक हालअपेष्टा, अन्याय, अत्याचार सहन करावा लागत आहे. इतक्या वर्षानंतरही जिवती तालुक्यातील भुमीहीन शेतकऱ्यांच्या जमीन पट्याचा विषय मार्गी लावण्याचे धाडस आजवर कोणत्याही नेत्यांनी केलेले नाही. त्यामळे शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या पुर्ण झाल्या. परंतु तिसऱ्या पिढीलाही स्वतःच्या जमीनीच्या हक्काचा पट्टा आणि सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या जमीनीचा मालकी हक्क त्यांना मिळवा. यांसाठी शेतकरी पुत्र म्हणून उपोषण करीत आहे.