Wednesday, July 03, 2024 02:18:00 AM

विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

विदर्भ महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

अकोला - नागपूर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अकोला - नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते १४ डिसेंबर या कालावधीत काही गाड्या रद्द, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

परिणामी विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेस ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरपर्यंतच धावणार आहे. मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ५ ते १३ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ४ ते १२ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल.


सम्बन्धित सामग्री