Sunday, October 06, 2024 02:55:40 AM

वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद

वालिवली पूल दुरुस्तीसाठी महिनाभर बंद

बदलापूर, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बदलापूर शहराच्या वेशीवरील तसेच बदलापुरला कल्याण, मुरबाड तालुका आणि कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा उल्हासनदीवरील वालिवली पूल पुढील महिनाभर एमआयडीसीकडून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ४४ वर्षे जुन्या पुलाची सहा कोटी खर्च करून दुरुस्ती केली जाणार आहे.

त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढील महिनाभर वाहतूक विभागाच्या नियोजनानुसार पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. काळात मात्र अंतर्गत रस्त्यावर वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांच्या आणि बदलापूर शहराच्या वेशीवरील अनेक गावांतील नागरिक रेल्वे प्रवासासाठी बदलापूर रेल्वे स्थानकाचा वापर करतात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोज आपले घर गाठण्यासाठी बदलापूर शहरातील एरंजाड ते वालिवली या मार्गाने प्रवास करावा लागतो. तसेच मुरबाड आणि कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी बदलापूर शहराच्या बाह्य भागातून वालिवलीमार्गे प्रवास सोयीचा ठरतो. यासाठी उल्हास नदीवरील वलिवली पूल नागरिकांना ओलांडावा लागत असतो. त्यामुळे कोंडीमुक्त आणि वेळेची बचत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या पुलाचा वापर करतात.

        

सम्बन्धित सामग्री