Wednesday, May 28, 2025 10:09:14 AM

अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा रस्ता रोको

अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा रस्ता रोको

नाशिक, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: अवकाळी आणि गारपिटीने नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी. सोसायटी बँकेचे असलेले पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. अशा विविध मागण्यांसाठी निफाड येथील शेतकऱ्यांनी नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या शांतीनगर चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले. रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विसकळीत झाली होती.


सम्बन्धित सामग्री