Friday, July 05, 2024 03:32:59 AM

भिवंडीत छत्रपती महाराजांचे महाराष्ट्रातले पहिले मंदिर

भिवंडीत छत्रपती महाराजांचे महाराष्ट्रातले पहिले मंदिर

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारत असून येत्या २८ मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवरायांचे हे मंदिर फक्त दर्शनस्थळ न बनता हे शक्तीपीठ असावे जेथे महाराजांचे जीवन समाजातील सर्व वर्गासाठी प्रेरणादायी राहील, असा कटाक्ष ठेवून या मंदिर उभारण्यात येत आहे. महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यां सारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी व भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री