Sunday, October 06, 2024 04:38:49 AM

दिमाखदार सोहळ्यात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

दिमाखदार सोहळ्यात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

सिंधुदुर्ग, ०४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नाैदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला महाराजांचे आरमार आणि सागर सुरक्षेस दिलेल्या प्राधान्यातून निर्माण झालेला आहे. नाैदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा ४५ फुट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. नौसेना दिनाच्या निमित्तानं सोमवारी मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. नौदलानं यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजता करण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे भारतीय नौदलानं यावेळी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फिटलं.


सम्बन्धित सामग्री