Tuesday, July 02, 2024 08:46:00 AM

‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम

‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम

पुणे, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ टीमच्या पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या टीमने जर्मनीचा विक्रम मोडीत काढत ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’चा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या ऐतिहासिक रॅलीला सुमारे ३० हजार सायकलपटू सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केला आहे.

इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली जाते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ टीमने विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. यावेळी आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे यांच्यासह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री