Friday, July 05, 2024 10:27:58 PM

प्रदूषणानं घुसमटतंय चंद्रपूर

प्रदूषणानं घुसमटतंय चंद्रपूर

चंद्रपूर, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळीच्या दिवशी फटक्यांनी प्रदूषणाची मात्रा वाढली होती. नंतर बहुतांश महत्वपूर्ण शहरांतील प्रदूषण कमी झाले. चंद्रपूर, नागपूर आणि सोलापुरातील प्रदूषणाचा हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र वाढल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपासून चंद्रपुरातील प्रदूषण राज्यात सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपुरात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे सूक्ष्म धूलिकणांचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. नोव्हेंबर महिन्याचे ३० ही दिवस या शहरातील नागरिकांची प्रदूषणाने घुसमट झाली आहे.


सम्बन्धित सामग्री