Saturday, June 29, 2024 02:06:57 AM

छत्रपती संभाजीनगरला मुसळधार पावसाचा तडाखा

छत्रपती संभाजीनगरला मुसळधार पावसाचा तडाखा

छत्रपती संभाजीनगर, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर शहराला गुरुवारी रात्रभर पावसाने झोडपले. रात्री दीड-दोनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत कोसळत होता. या पावसामुळे हर्सूल तलावाची पाणी पातळी अडीच फुटांनी वाढली. या तलावात आता सोळा फुटापर्यंत पाणी जमा झाले असून तलावात पाण्याची आवक सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांत सडकून मार दिला आहे.

गुरुवारी रात्री तर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. रात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पावसाने उग्र रूप धारण केले होते. पावसाचा वेग इतका होता की काही मिनिटांमध्ये रस्ते जलमय झाले. सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. शहरात अनेक ठिाकणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी कामे झाली असली तरी रस्त्यांची उंची आणि घरांची व दुकानांच्या उंबरठ्याची उंची सारखी नसल्यामुळे घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या.


सम्बन्धित सामग्री