Saturday, October 05, 2024 04:38:17 PM

पंधरा दिवसाच्या थकव्यानंतर विठुराया घेणार विश्रांती

पंधरा दिवसाच्या थकव्यानंतर विठुराया घेणार विश्रांती

पंढरपूर , २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी यात्रेसाठीआलेल्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी सलग १५ दिवस अहोरात्र उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या विश्रांतीचा काळ सुरु झाला आहे. शुक्रवार १ डिसेंबर रोजी विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा संपली असून आता देवाचे राजोपचार सुरु झाले आहेत. यासाठी देवाचा देवाचा काढलेला पलंग पुन्हा बसवण्यात आलाय.

शुक्रवारी ( १ डिसेंबर रोजी) भल्या पहाटे विठुरायाच्या चरणाला लिंबू आणि साखर चोळून ठेवण्यात आली. यानंतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आले. यानंतर दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली . मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते रुक्मिणी मातेकडे तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली .या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रम्ह वृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला . यावेळी रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी आणि पुतळ्याची माळ अशा पारंपारिक दागिन्यांनी साज चढवण्यात आला. या पूजेनंतर देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आणि देवाची महाआरती करण्यात आली .


सम्बन्धित सामग्री