Sunday, June 30, 2024 10:01:30 AM

लोणार ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या जीवाशी खेळ

लोणार ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या जीवाशी खेळ

बुलढाणा, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पाच महिला आल्या होत्या. या महिलांना कोणत्याही प्रकारची भूल न देता शस्रक्रियेला सुरुवात केली. मात्र या पाचही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान यामुळे या महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

रुग्णालयाच्या या बेजबाबदार कारभारासाठी जाब विचारायला या महिलांचे नातेवाईक पोहोचले. नातेवाईकांनी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि डॉक्टरांसोबतचे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅमेरा सुरू असल्याचे पाहून डॉक्टरांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला. महिलांना झालेल्या नाहक शारिरीक आणि मानसिक त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. या धक्कादायक घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी पिडीत महिलांच्या नातेवाईकांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री