Thursday, July 04, 2024 09:35:12 AM

दहा वर्षीय चिमुकल्या मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

दहा वर्षीय चिमुकल्या मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

पालघर, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पालघर मधील कुडन परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर मध्ये दहा वर्षीय चिमुकल्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात प्रेम जितेंद्र पाटील हा दहा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी अवस्थेत आहे. जखमी चिमुकल्या मुलावर दादरा नगर हवेलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागासह स्थानिक पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत. सूत्रांनुसार चिमुकल्या मुलाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री