Wednesday, October 02, 2024 10:54:34 AM

कोल्हापूरात 'झिका' चे संकट

कोल्हापूरात झिका चे संकट

कोल्हापूर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: कोल्हापूरकरांची झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. कोल्हापूरमध्ये झिका व्हायरसचे ६ रुग्ण आढळले आहे. कोल्हापुरात झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील १,४९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीत तापाचे ६ रुग्ण आढळले आहेत. सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे ३९२ घरांचे सर्वेक्षण झाले आहे. यात २४३ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.

झिका व्हायरसची लक्षणे
झिकाची लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात. झिकाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. ताप, त्वचेवर लाल ठिपके, सांधेदुखी, डोळे लाल होणे साधारण अशी लक्षणे दिसतात. लक्षणे साधारणपणे दोन-तीन दिवसांपासून आठवडाभर टिकतात.

        

सम्बन्धित सामग्री