Friday, July 05, 2024 05:55:29 AM

महाराष्ट्रात पुढील ४८ तास पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील ४८ तास पावसाची शक्यता

महाराष्ट्र, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्यात हिवाळी मौसमात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पश्चिमी विक्षोभामुळे देशभरातील हवामानात मोठा बदल झाला आहे. आजही देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून आज महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात विविध ठिकाणी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदिया येथे पावसाच्या सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री