Thursday, July 04, 2024 10:00:13 AM

कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद

कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद

कोल्हापूर, २६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: उजळाईवाडी येथील विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सकडून सध्या नियमित सुरू असलेली कोल्हापूर-तिरुपती या थेट विमानसेवा १५ डिसेंबरपासून बंद होणार असल्याचे कळत आहे. त्यानंतर ही सेवा व्हाया हैदराबाद अशी होणार असल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा तीन तास पाच मिनिटे जादा वेळ तसेच सव्वा दोन हजारांहून अधिक तिकीट दराचा फटका बसणार आहे.

याबाबतची माहिती इंडिगो कंपनीने संकेतस्थळावरून दिली आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, वेळेचे बचत व्हावी, या हेतूने कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. बारा मे २०१९ रोजी इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली. सुरुवातीपासून या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या काळातही सेवा राहिली. त्यानंतर एक मे २०२१ पासून पुन्हा या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही सेवा अखंडित सुरू होती. त्याला प्रतिसादही चांगला आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती दर्शनासाठी कोल्हापूर-तिरुपती ही थेट विमानसेवा असल्याने मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, ती बंद होत असल्याने आता भाविक प्रवाशांना कोल्हापूरहून थेट तिरुपतीला जाता येणार नाही. नव्या सेवेनुसार तिरुपतीला जायचे असेल तर व्हाया हैदराबाद जावे लागणार आहे.

        

सम्बन्धित सामग्री