Thursday, July 04, 2024 10:46:39 AM

हिंगोलीला भूकंपाचा पुन्हा धक्का

हिंगोलीला भूकंपाचा पुन्हा धक्का

हिंगोली, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी (१९ नोव्हेंबर) मध्यरात्री नागरिक साखर झोपेत असताना अचानक जमिनी मध्ये गुढ आवाज होऊन जमीन हादरली आहे, सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. या हिंगोली मध्ये झालेल्या या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर नोंद झाली असून 3.5 रिस्टर्स केअर चा हा भूकंप असल्याची माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाने दिली.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात जमिनीतून गुढ आवाज होत आहे. अधून-मधून जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहे. अचानक जमीन हादरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रविवारी रात्री औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी,वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा शिंदे , कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूगर्भातून गुढ आवाज येऊन अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची पळापळ झाली.काही घरांमधील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पोलीस व महसूल पथक या गावांमध्ये पाठवले असून नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यात सर्व गाव झोपेत असताना रात्री १२:४ मिनिटांनी भूकंपाचा जोराचा धक्का जाणवला होता. त्यामुळे सर्व गाव जागा झाला अन् काही वेळातच सर्व नागरीक रस्त्यावर आले होते. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिंदे पांगरा, वापटी, राजवाडी, आंबा, चोंडी स्टेशन, वरताळा आदी ठिकाणची जमीनही हादरली होती.


सम्बन्धित सामग्री