Sunday, July 07, 2024 12:44:44 AM

भंडाऱ्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

भंडाऱ्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

भंडारा, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: भंडारा जिल्ह्यात धान कापणी आणि मळणी सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटत आहे. शासनाने धान खरेदी केंद्राने लावलेले नवीन निकष रद्द करून या खरीप हंगामात जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वी घेतला.

पण शासनाने शासकीय धान खरेदीला सुरुवात करण्याचा जीआर अद्यापही जिल्ह्यात पोहचला नाही. परिणामी, धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नसली तरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २० धान खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजुरी दिली आहे. नुकतेच धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी नोंदणी बंद असल्याने शेतकन्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

        

सम्बन्धित सामग्री