Thursday, July 04, 2024 11:13:44 AM

मुंबईत राजकीय आकाशकंदीलांचा झगमगाट

मुंबईत राजकीय आकाशकंदीलांचा झगमगाट

मुंबई, ०९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: एक मोठा कंदील तयार करण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. चार जणांचे कष्ट त्यामागे असतात. पूर्वी भाजपाची एकाही कंदिलाची मागणी नव्हती. मात्र, गेली काही वर्षे सर्वाधिक कंदील भाजपासाठी तयार केली जात आहेत. त्यामुळे कंदील निर्मितीतून मिळणारे उत्पन्न ही वाढले आहे. २०२२ मध्ये नागपूरमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी कंदिलाची मागणी केली होती. यंदा नागपूरच्या कंदिलांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईहून नागपूरला सर्वाधिक मोठे कंदील पाठविण्यात येणार असल्याची माहिती कंदील व्यापारी प्रकाश जठाळ यांनी दिली.

गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चौकाचौकांत, रस्त्यांवर १०० कंदील लावले होते. या पक्षाचा शिवाजी पार्कमध्येही दीपोत्सव लक्षवेधी ठरत आहे. यंदा मनसेच्या कंदिलांच्या मागणीत ४० ने भर पडली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कंदिलांच्या मागणीत यंदा मोठी घाट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे ८० कंदील शिवसेनेने शहरात लावले होते. यंदा तुलनेत शिवसेनेचे कंदील कमी असण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही कंदिलांची कमी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा परिणाम पक्षांच्या दिवाळीतील सोहळ्यांवर पडण्याची शक्यता आहे. मुंबईत अनेक भागात शिवसेनेचे आकाशकंदील दिसत होते. ती जागा आता भाजपाने घेतली आहे. यंदा काही ठिकाणी शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे कंदील दिसण्याची शक्यता आहे. शिवाय मनसेही यात आघाडीवर आहे. यंदाच्या वर्षी राजकीय पक्षांच्या आकाशकंदिलांची बाजारपेठ तेजीत आहे. शिवाय मुंबईत साकरलेले कंदील नागपूरमध्येही पाहायला मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री