Sunday, July 07, 2024 11:05:54 PM

कुणबी प्रमाणपत्रासाठी सोलापूर मदत केंद्र

कुणबी प्रमाणपत्रासाठी सोलापूर मदत केंद्र

पंढरपूर, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मदत केंद्र उभारले आहेत. १९६७ पूर्वीचे अनेक दस्तऐवज हे मोडी लिपीतील आहेत. त्यामुळे मोडी लिपीत कुणबी हा शब्द कसा दिसतो. हे पाहून ते मोठ्या अक्षरात प्रत्येक मदत केंद्रात लावले जातील. तेथून कुणबी जातीचे दस्तऐवज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील. आणि मगच त्यांची पूर्ण तपासणी करून आम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहोत. अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर तहसील कार्यालयातील कुणबी मदत तपासणी केंद्रास भेट दिली. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपण सुरुवात केली आहे. लवकरात लवकर मदत कशाच्या माध्यमातून आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ. सध्या अस्तीत्वतील कागदपत्र आम्ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देऊ. त्याठिकाणहुन नागरिकांनी उपलब्ध दस्तऐवज नुसार कुणाचेही आजोबा किंवा तत्सम व्यक्तीचे नोंदणी असेल. तर संबंधित व्यक्ती कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी करू शकते.


सम्बन्धित सामग्री