Thursday, July 04, 2024 11:19:03 AM

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवार सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या बाजूने मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळवण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झि वरून वळवून पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.


सम्बन्धित सामग्री