Tuesday, July 09, 2024 01:38:14 AM

पुण्यातील वानवडीत सराफा व्यावसायिकावर गोळीबार

पुण्यातील वानवडीत सराफा व्यावसायिकावर गोळीबार

पुणे, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोडवर सोने व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

दिवाळीचे दिवस असल्याने लोकांची सोने-चांदी खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच सोने-चांदी घरी घेऊन जात असताना एका सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सराफाकडील दागिने हिसकवण्याचा तीन चोरट्यांनी प्रयत्न केला. रात्री दहा वाजताच्या सुमाराची ही घटना आहे. प्रदीप मदनलाल ओसवाल असं सराफाचं नाव असून ते मुंढव्याचे रहिवाशी असल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायावर दोन आणि तोंडावर एक गोळी लागलीये. सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ओसवाल यांचे हडपसरमधील सय्यदनगरमध्ये सराफी दुकान आहे. दुकान बंद करुन ते घराकडे निघाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक ओसवाल यांची छोटीशी सराफा पेढी आहे. ते रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून वडिलांसमवेत दुचाकीवरून घरी निघाले होते. बीटी कवडे रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी प्रतीक यांच्या दिशेने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. प्रतीक यांच्या मांडीवर आणि गालावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत

           

सम्बन्धित सामग्री