Friday, July 05, 2024 03:02:52 AM

रोहित पवारांची संघर्ष यात्रा दिवाळीनंतर

रोहित पवारांची संघर्ष यात्रा दिवाळीनंतर

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवारांनीदेखील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला, पण दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही यात्रा मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागल्यानंतर स्थगित करत असल्याची घोषणा पवारांनी केली. मात्र, आता रोहित पवारांची संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही ८०० किलोमीटरची असणार आहे. पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन नागपूर येथे समारोप ७ डिसेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होमपीच असलेल्या नागपूरला यात्रेचा समारोप होणार आहे. युवा संघर्ष यात्रेत पवार हे एकूण ४५ दिवसांचा प्रवास करणार असून, त्यात दिवसाला १७ ते १८ किलोमीटरचा प्रवास असणार आहे. दिवसाच्या दोन टप्प्यांत ही यात्रा सुरू राहणार आहे.

पुण्यातील तुळापूर, काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशीम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री