Saturday, October 05, 2024 02:42:12 PM

ठाणे कारागृहात दिवाळी मेळाव्याचे आयोजन

ठाणे कारागृहात दिवाळी मेळाव्याचे आयोजन

ठाणे, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असतांना बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

सदर दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तु आणि प्रदर्शन विक्री केंद्राचे उदघाटन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आणि ठाणे कारागृह अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी मेळाव्या निमित्त कारागृह निर्मित वस्तु व प्रदर्शन विक्री केंद्राचे उदघाटन प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे कौतुक करुन सर्व जनतेला सदरील वस्तु खरेदी करण्याचे आवाहन केले.

सदर दिवाळी मेळावा विक्री करीता बंद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, चारचकी गाडया, बैलगाडी, रिव्हॉलिग चेअर, हट टाईप कि स्टॅड, मोबाईल स्टँड, तसेच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हात रूमाल, बेकरी उत्पादने,ओटस बिस्कीट, इत्यादी ठेवण्यात आलेल्या होत्या.पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तुंची पाहणी व खरेदीसाठी मोठया प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे.


सम्बन्धित सामग्री