Wednesday, July 03, 2024 02:23:05 AM

मराठवाड्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ

मराठवाड्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ

छत्रपती संभाजीनगर, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : या मोसमात झालेल्या पावसाचाबारकाईने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून मराठवाड्यातीलसर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीरकरावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना पाठवलेल्या निवेदनातदानवे यांनी म्हटले आहे की, शासनाने मराठवाडा विभागातील ५ जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये गंभीरस्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

वास्तविक पाहता संपूर्णछत्रपती संभाजीनगर विभागात (मराठवाड्यात) आठही जिल्ह्यांतसर्व तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यमस्वरूपाची दुष्काळसदृश परिस्थिती आहे. असे असताना शासनाने केवळ ५ जिल्ह्यांतील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणेम्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. खरीप हंगाम २०२३ च्या सुरुवातीस पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली. जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने पिके आडवी झाली आणि परतऑगस्टमध्ये पावसाने ताण दिला.

त्यामुळे मराठवाड्यातील आठहीजिल्ह्यांतील जवळपास सर्वमंडळांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीरझाली व खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्याहातून पूर्णतः गेले.सप्टेंबरमध्ये काही भागात पाऊसझाला असला तरी पिकांच्या फळधारणेच्या कालावधीतपावसाचा खंड झाल्यामुळे उत्पादकतेमध्ये फार मोठी घट आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीरकरताना कमी पर्जन्यमान, पावसाचा२१ दिवसांचा खंड, अंतिम आणेवारीहे निकष तपासलेच नाहीत, असेहीदानवे यांनी पत्रात म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री