Saturday, July 06, 2024 11:20:11 PM

शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

नंदुरबार, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील नागाई देवी शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडे १,३०० शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये उसाचे घेणे बाकी आहे. मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले जात नसल्याने, ऊस उत्पादक शेतकरी यांनी नर्मदा बचाव आंदोलन यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू केले आहे.

नागाई देवी साखर कारखान्याला शेतकऱ्यांसोबतच कामगार वाहतूक करणारे अशा अनेक लोकांचं पैसे थकीत झाले आहेत मात्र प्रशासन देखील या गोष्टीत गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठ संकट आलं आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसे आद्यपही मिळालेला नाही यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी देखील अंधारात जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे कारखानदाराने शेतकऱ्यांचे पैसे लवकर दिले नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्मदा बचाव आंदोलनांकडून देण्यात आलेला आहे.


सम्बन्धित सामग्री