Thursday, July 04, 2024 09:48:38 AM

बुलढाण्यात शांती उत्सवाला सुरुवात

बुलढाण्यात शांती उत्सवाला सुरुवात

बुलढाणा , ६ नोव्हेंबर २०२३ , प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात नवरात्री उत्सवानंतर कोजागिरीच्या शांती उत्सवाला सुरुवात होते. या भागात नवरात्री उत्सवापेक्षाही या शांती उत्सवाला महत्त्व दिले जाते. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात या शांती उत्सवात मोठ्या देवीची स्थापना करून या उत्सवाचा प्रारंभ होतो. या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे.

गेल्या ११५ वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शांती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या उत्सवात मध्यप्रदेश मधील बोधनची आई म्हणजेच मोठ्या देवीची खामगाव शहरात स्थापना केली जाते. कोजागिरी पौर्णिमेपासून दहा दिवस हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविक या मोठ्या देवीच्या दर्शनाला येत असतात. दरवर्षी दाखल होत असतात. नवसाला पावणारी बोधनची आई म्हणून या मोठया देवीची सर्वत्र ओळख आहे. त्यामुळे दहा दिवस मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी जगदंबा मंडळ स्थापन करून हा शांती उत्सव साजरा केला जातो.


सम्बन्धित सामग्री