Sunday, October 06, 2024 06:40:18 PM

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सुरू

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सुरू

रायगड, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: पर्यटकांची दिवाळी गोड करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरानच्या मिनीट्रेनची सेवा ही पुन्हा नेरळ ते माथेरान अशी सुरु करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर म्हणजेच शनिवार पासून नेरळ - माथेरान - नेरळ ही मिनीट्रेनची सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेप्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरु आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद करण्यात आली होती. पण ही सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री