Thursday, July 04, 2024 09:32:34 AM

शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांचा पुन्हा एकदा एल्गार

शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांचा पुन्हा एकदा एल्गार

बुलढाणा, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राजू शेट्टी पाठोपाठ शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर हे देखील मैदानात उतरणार आहेत. विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांची पाच नोव्हेंबर पासून एल्गार रथयात्रा काढणार आहेत. संत नगरी शेगाव येथून आपल्या एल्गार रथ यात्रेची सुरुवात करणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठीची एल्गार रथयात्रा सुरू करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणादरम्यान रविकांत तुपकर यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यानंतर पुन्हा एकदा रविकांत तुपकर देखील विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. पाच नोव्हेंबरपासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढत आहेत. संतनगरी शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रविकांत तुपकर आपल्या या एल्गार रथयात्रेला सुरुवात करणार आहेत. या एल्गार यात्रेचा समारोप २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात भव्य मोर्चात केला जाणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे. यावेळी या एल्गार रथयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री