Saturday, July 06, 2024 11:12:12 PM

नवले पुलावर टायर जाळून रास्तारोको

नवले पुलावर टायर जाळून रास्तारोको

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात अनेक आंदोलने केली जात आहेत. मंगळवारी पुण्यातील नवले पूल परिसरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवल्याचा प्रकार समोर आला. वडगाव तसेच नवले पुलावर वाहनांचे टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली.

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नवले पूल येथे घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांगच रांग लागल्या. शेकडो नागरिक दीर्घकाळ अडकून पडले. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका आणि शाळांच्या बस देखील अडकल्या.


सम्बन्धित सामग्री