Sunday, July 07, 2024 12:07:18 AM

सोलापुरात एमडी ड्रग्ज कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

सोलापुरात एमडी ड्रग्ज कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त


सोलापूर, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्य कारखान्यावर धाड टाकल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी पुन्हा त्याच भागात दुसऱ्यांदा छापा टाकला. शुक्रवारी सायंकाळी उशिराने सोलापुरातील ‘नशेचे गोदाम’ उद्ध्वस्त करण्यात आले.या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला ‘एमडी’चा कारखाना नाशिक अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तेथून दहा कोटी रुपयांच्या ‘एमडी’सह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरून वीस हजार रुपये दरमहा नफ्याकरिता कारखान्याचा कायदेशीर करार केला होता. काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २) वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली. वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली. त्यांनी शुक्रवारी (दि. ३) सोलापुरातल्या गोदामात धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला. आज, शनिवारी (दि. ४) आयुक्तालयातर्फे या कारवाईसंदर्भातील विस्तृत माहिती स्पष्ट होणार आहे.


सम्बन्धित सामग्री