Tuesday, July 09, 2024 01:32:41 AM

ऊस गाळप हंगाम

ऊस गाळप हंगाम

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी येईल. अंदाजे ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल. मागच्या वर्षी २११ साखर कारखान्यांच्या माध्यमातून १०५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन निघाले. यंदा ऊसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादनात घट होणार आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.


सम्बन्धित सामग्री